आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धुळ्यामध्ये 23 वर्षांचा ज्ञानेश्वर पाटील आत्महत्येचा प्रयत्न करत होता. त्याने फेसबुक LIVE देखील केले. सोशल मीडिया साइटच्या आयरलँड येथील हेड ऑफिसने पाहिले तर मुंबई पोलिसांकडून सायबर सेलला सूचना दिली आणि ज्ञानेश्वरचा जीव वाचवला.
ज्ञानेश्वर फेसबुकवर LIVE जाऊन वारंवार ब्लेडने गळा कापत होता. आयरलँडकडून याचे वृत्त मिळाल्यावर सायबर सेलच्या DCP रश्मी करंदीकरने धुळे पोलिसांची माहिती दिली. तेथून एक टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि 1 तासात तरुणाला वाचवले.
7695 किलोमीटर अंतरावरुन मुंबई पोलिसांना केले अलर्ट
ही घटना रविवारी रात्री 8 वाजता मुंबईपासून 323 किलोमीटर दूर धुळ्याच्या भोई सोसायटीची आहे. ज्ञानेश्वर पाटिल घरात एकटाच हात होता. तो सोशल मीडियावर LIVE येत म्हणाला होता की - 'सर्व मला त्रास देतात, मी सर्वांना त्रास देतो. यामुळे मला माझे जीवन संपवायचे आहे. त्याचे हे कृत्य 7,695 किलोमीटर दूर आयरलँडचे फेसबुक हेड ऑफिसमध्ये बसलेल्या काही लोकांनी पाहिला आणि मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला अलर्ट केले.'
रात्री 8 वाजता
सायबर सेलच्या DCP रश्मी करंदीकर यांनी सांगितले, 'रविवारी रात्री जवळपास 8 वाजता आम्हाला आयरलँडच्या फेसबुक हेडक्वॉर्टरमधून कॉल आला की, तुमच्या परिसरात एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. त्याचे दोन्ही हात आणि गळ्यातून रक्त वाहत आहे. तात्काळ मदत करा. आम्ही तात्काळ आपली टीम बोलवून अलर्ट करुन तरुणाविषयी माहिती घेण्यास सांगितले.'
8.30 वाजता रश्मी यांनी पुढे सांगितले की, 'सायबर सेलच्या टीमला कळले की, तरुण धुळ्यात राहणारा आहे. वेळ कमी असल्यामुळे आम्हाला पिन पॉइंट लोकेशन ट्रेस करायचा होता. आम्ही नाशिक रेंजचे IG प्रताप दीघावकर आणि धुळ्याचे SP चिन्मय पंडित यांना सूचना दिली. याच काळात सायबर सेलला लोकेशन मिळाली. '
9 वाजता लोकेशन मिळताच धुळ्याची पोलिस टीम घटनास्थळी पोहोचली आणि ज्ञानेश्वर पाटील यांना रेस्क्यू करुन रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टर्सने म्हटले की, परिस्थिती धोक्याच्या बाहेर आहे आणि काही दिवसात जखमा बऱ्या होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.