आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकारचा निर्णय:​​​​​​​पुरामुळे नुकसान झालेल्या भागांमध्ये वीज बिल वसूली करु नका, उर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त भागांचा दौरा करत पाहणी केली आहे

राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे विविध दुर्घटनांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत तर हजारो कुटुंब हे रस्त्यावर आले आहेत. सर्व काही पाण्यात बुडाल्यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, असे आदेश आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

याविषयी बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, आम्ही पूरग्रस्त भागात वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी वसुली केली जाणार नाही. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत वीजबिलंदेखील दिली जाणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच लोकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती निवळल्यानंतर वीज बिल देत असतानाही कितपत दिलासा देऊ शकतो यावरही विचार केला जाईल. तसेच वीजबिल माफ करण्यासंबंधंचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त भागांचा दौरा करत पाहणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.

बातम्या आणखी आहेत...