आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra : ED Has Attached Immovable Assets Worth ₹4.20 Crore Belonging To Anil Deshmukh And His Family Under PMLA In A Corruption Case

ईडीची'पिडा':माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा दणका, ईडीने चार कोटींची मालमत्ता केली जप्त; 100 कोटी वसुलीच्या आरोपांनंतर सापडले आहेत अडचणीत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर देशमुख अडचणीत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावला होता. मात्र प्रकृतीचे कारण देऊन अनिल देशमुख हे चौकशीला हजर राहिले नव्हते. दरम्यान ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. यांच्या केलेल्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर देशमुख हे अडचणीत सापडले आहेत.

ईडीने देशमुखांच्या घरांवर टाकले होते छापे
गेल्या काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. यावेळी दिवसभर ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या घराची झडती घेतली होती. तसेच त्यांना अनेक प्रश्नही विचारण्यात आले होते. ही कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच आरोप केले होते. तसे आपण ईडीला संपूर्ण सहकार्य करत असल्याचेही देशमुख म्हणाले होते.

परमबीर सिंहांच्या लेटर बॉम्बनंतर देशमुख अडचणीत
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख एपीआय सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिले असल्याचा आरोप परमबीर सिंहांनी यांनी केला आहे. तसेच या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

बातम्या आणखी आहेत...