आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली:म्हणाले - राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद! पाठीवर हात ठेवल्याशिवाय बोलत नाहीत

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असतात. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत.'' अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राजकीय नेत्यांवर आज टीकास्त्र सोडले.

पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीअर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात त्यांनी राजकारण्यांवर हल्लाबोल केला.

वन स्टेट वन एक्झाम

खोत म्हणाले,. 2015 मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक घेतली होती. त्यात विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला होता. आता अभिमन्यू पवार यांनी फडणवीस यांच्याशी बोलून आताही तशीच बैठक घ्यावी. वन स्टेट वन एक्झाम घ्यायला हव्यात. त्यात ग्रामसेवक, तलाठी, प्राध्यापक आणि शिक्षक सगळ्याच भरती एमपीएससीच्या छताखाली यायला हव्यात. यामुळे नोकरीच्या संधी बरोबरच गुणवत्ता मोठ्या प्रमाणात तयार होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या वयाचा देखील विचार व्हायला हवा.
विद्यार्थ्यांचे वय वाढतेय

खोत म्हणाले, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लाखो विद्यार्थी आशेने या परीक्षेचा अभ्यास करतात. त्यांची निवड होऊनही काही कामे अर्धवट राहत आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने मदत करायला हवी. विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे.

फडणवीसांनी बैठक घेतल्यास प्रश्न सुटतील

खोत म्हणाले, 50 टक्के मंत्र्याचे काम हे अधिकारीच करततात. त्यामुळे दोघांनीही यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांना विद्यार्थ्यांचे आणि सर्वांचेच प्रश्न माहित आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीची बैठक घेऊन या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावायला हवेत.

बातम्या आणखी आहेत...