आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत आज पुन्हा आगडोंब:प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोदामाला भीषण आग, 15 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वायरच्या गोदामाचा तळ मजला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागल्याची माहिती आहे.

राज्यात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. शुक्रवारीच भांडुपच्या मॉलमध्ये भीषण आग लागली होती. यामुळे तेथे असलेले कोव्हिड रुग्णालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. यानंतर पुण्यात आगीची घटना घडली. आता पुन्हा एकदा मुंबईत भीषण आगीची घटना घडल्याचे समोर आले आहे. प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गादामाला भीषण आग लागली. घटनास्थळी 15 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुंबईतील प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोदामाला ही भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाचे 15 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. वायरच्या गोदामाचा तळ मजला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागल्याची माहिती आहे. घटास्थळी अधिकारीही दाखल झाले आहेत. या आगीवर नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...