आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पिंपरी चिंचवडचा प्रख्यात गुंड गजानन मार्नेला दोन लोकांच्या हत्ये प्रकरणी मुंबईतील तळोजा कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. गजाननच्या सुटकेची माहिती मिळताच त्यांच्या 300 समर्थक 50 गाड्यांच्या ताफ्यासह तळोजा जेलबाहेर पोहचले व बाहेर येताच त्याचे पुष्पवर्षाव करत स्वागत करत एक रोड शो काढण्यात आला.
मार्नेवर तीन वर्षापासून तुंरुगात
गजानन मार्नेवर पिंपरी चिंचवड येथील अमन बादे आणि पप्पू गांवडेच्या हत्येचा आरोप होता. हे दोन्ही गुन्हेगार असून ते गजानन गँगच्या विरोधात काम करत होते. या घटनेनंतर शहरात गँगवारची स्थिती निर्माण झाली होती. गजानन मार्नेला पोलिसांनी तीन वर्षानंतर अटक करत मुंबई येथील तळोजा कारागृहात बंद करण्यात आले होते. संबंधित प्रकरणामध्ये सतत सुनवाई होत गेली आणि पुराव्या अभावी गजानन मार्नेची कारागृहातून मुक्तता करण्यात आली.
कोणत्याच टोलनाक्यावर दिले नाही टोलचे पैसे
सोमवारी संध्याकाळी तो एक बुलेटप्रूफ एसयूवीमधून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांचे समर्थक कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्धारावर त्याची वाट पाहत होते. त्याला पाहताच नारेबाजी आणि पुष्पवृष्टी सुरु झाली आणि नंतर रोड शो काढण्यात आला. दरम्यान रोड शोमध्ये गजानन मार्नेची गाडी समोर चालत होती आणि त्यांचे समर्थक 50 गाड्यांच्या ताफ्यासह मागून येत होते. त्यावर आरोप आहेत की रोड शो दरम्यान त्याने कोणत्याच टोलनाक्यावर टोलचे पैसे भरले नाहीत.
नियम मोडल्यामूळे पून्हा दाखल झाला गुन्हा
पिंपरी चिंचवडचे कमिश्नर कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की या रोड शोला कव्हर करण्यासाठी विनापरवाना ड्रोनचा वापर केला गेला. पुढे म्हणाले की आम्ही या ड्रोनला ताब्यात घेत गजानन मार्ने आणि त्यांच्या 300 समर्थकाविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 143,273 आणि 135 अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.