आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षानंतर निर्बंध शिथिल:होळी खेळण्यासाठी हे आहेत नियम, राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेली दोन वर्षे होळी आणि धुलीवंदन हा सण साजरा करता आला नाही. यंदा मात्र होळी साजरा करण्यास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने होळी तसेच धुलीवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार रात्री 10 वाजेच्या आत होळी पेटवणे बंधनकारक असून, होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेली दोन वर्षे राज्यात नागरिकांना होळी खेळायला मिळाली नाहीये. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे निर्बंध देखील कमी करण्यात आले आहेत. आणि राज्यातील निर्बंध कमी झाल्याने आता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात होळी साजरा करण्याचा बेत आखला असेल तर तो यावर्षीदेखील फसणार आहे. कारण 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा सुरू असल्याने राज्याच्या गृहविभागाने डीजे लावण्यास आणि रात्री 10 नंतर होळी पेटवण्यास निर्बंध घातले आहेत. होळी आणि धुलीवंदन साजरे करत असताना मद्दपान करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या संदर्भातील नियमांचे पालन नागरिकांना करावेच लागणार आहे.

हे आहेत राज्य सरकारचे नियम

  • रात्री 10 वाजण्याच्या आत होळी पेटववी, त्यानंतर परवानगी नसणार
  • होळी आणि धुलीवंदन साजरे करताना डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायेदशीर कारवाई होणार
  • धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, किंवा फुगे मारू नये
  • कुठल्याही जाती किंवा धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही, अशा घोषणा देऊ नये
  • दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे डीजे लाऊ नये
  • होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई

सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवता आले असले तरी अजूनही काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढता आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्याने होळी आणि धूलिवंदन साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...