आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पत्रकारांसाठी खुशखबर:कोरोना संक्रमण काळात पत्रकारांना मिळाला 50 लाख रुपयांचा अपघात विमा; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत एप्रिलमध्ये 171 पत्रकारांची चाचणी झाली. यातील 53 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते.
  • राज्यातील पत्रकारांना आता 50 लाखांचे अॅक्सिडेंट कव्हर, कुटुंबियांना मिळणार आधार

राज्यात कोरोनाचे वाढते संक्रमण आणि त्यामध्ये झटणाऱ्या पत्रकारांची आता राज्य सरकारने चिंता केली आहे. महाराष्ट्र सरकार पत्रकारांना 50 लााख रुपयांचा अपघात विमा देत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली आहे. राज्यात पोलिस, डॉक्टर, होमगार्ड आणि अंगनवाडी सेविकांना देखील राज्य सरकारने 50 लाखांच्या अॅक्सिडेंट कव्हरमध्ये समाविष्ट केले आहे. कोरोना संकटात जे कर्मचारी सर्व्हे, काँटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि बचावकार्य करत आहे त्या सर्वांना यात जोडले जात आहे.

आरोग्य मंत्र्यांची घोषणा

आरोग्य मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोना संकट काळात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर अतिशय जोखिमेचे काम करत आहेत. सरकार या लोकांसाठी व्यापक असा अपघात विमा देण्याचे काम करत आहे. कोरोना संकटात आपले जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्यांच्या पत्रकारांना यातून आधार मिळेल.

मुंबईत 53 पत्रकार होते कोरोना पॉझिटिव्ह

उल्लेखनीय बाब म्हणजे, एप्रिल महिन्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांनाच आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश पत्रकार बरे होऊन घरी सुद्धा गेले आहेत. फील्डवर काम करणाऱ्या 171 पत्रकारांच्या चाचण्या घेतल्यानंतर कोरोनाचे रुग्ण समोर आले होते. त्यामध्ये पत्रकार, फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरचा समावेश होता.

दरम्यान, आता महाराष्ट्र सरकारच्या नवीन गाइडलाइननुसार, सर्व वाचकांना घरपोच वृत्तपत्र मिळणार आहे. सरकारने राज्यभरात न्यूजपेपरच्या प्रिंटिंग आणि डिस्ट्रिब्युशनसह घरोघरी वितरणाला मंजुरी दिली आहे. सोमवारपासून आता लोक घरबसल्या नेहमीसारखे न्यूजपेपर वाचू शकतील. परंतु, वितरक आणि हॉकर्स यांना स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.

0