आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सरकारचा निर्णय:राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, ठाकरे सरकारने घेतला निर्णय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून सतत मुदतवाढ दिली जात आहे.

देशासह राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. यामुळे राज्य सरकारकडून झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवले जाणार आहे. राज्य सरकारने याविषयी परिपत्रक जारी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून सतत मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या यानंतरही बंदच राहणार आहे.