आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Government Has Decided To Allow Standalone Shops Including Liquor Shops To Open In Red Zone Also Except The Containment Zones

मद्यप्रेमींना दिलासा:कंटेनमेंट झोन वगळता रेड झोनमध्येही मद्यविक्रीस राज्य सरकारची सशर्त परवानगी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रांत मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउन 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशातील सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी केली आहे. 4 मे पासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मुंबई, पुण्यातील तसेच कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आली आहे.

राज्य सरकारने रेड झोनमधील दारुच्या दुकानांसह स्टँडअलोन दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी यात ग्राहकांना एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कोरोनाच्या संकटात संपुर्ण देशात लॉकडाऊनमुळे सरकारचा मोठा महसूल बुडत असल्याने मद्यविक्रीची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे आहेत नियम आणि अटी 

> बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी > मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार > एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार > प्रत्येक लेनमध्ये जीवनावश्यक दुकाने वगळता केवळ पाच दुकाने उघडली जाऊ शकतात > जीवनावश्यक दुकानांच्या संख्येवर मात्र बंधन नाही.

बातम्या आणखी आहेत...