आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेटमार्क:नवीन वर्षात लेटलतिफ ‘बाबूं’वर शिस्तीचा बडगा, आता महिन्यात केवळ २ लेटमार्क माफ केले जाणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवे नियम सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जारी केले आहेत.

मंत्रालय तसेच मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय कार्यालयांत यापुढे महिन्यात केवळ दोन लेटमार्क माफ केले जातील. त्यानंतरच्या प्रत्येक तीन लेट मार्कला एक नैमित्तिक रजा वजा केली जाईल. नवे नियम सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जारी केले आहेत.

मंत्रालय वगळता क्षेत्रीय कार्यालयातील अ ते क वर्गातील कर्मचाऱ्यांचा कार्यालयांचा वेळ ९.४५ ते ६.१५ असेल. शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी ९.३० ते ६.३० अशी वेळ असेल. पहिल्या वेळी दीड तास हा उशीर समजला जाईल. महिन्यातील पहिले २ लेट मार्क माफ केले जातील. तिसऱ्या, सहाव्या व नवव्या उशिरास एक नैमित्तिक रजा, ती नसेल तर अर्जित रजा वजा केली जाईल. ती नसेल तर असाधारण (विनावेतन) रजा वजा केली जाईल. मात्र वैद्यकीय कारणांसाठीची परिवर्तित रजा उशिरासाठी वापरली जाणार नाही. ९ वेळेस उशीर झाल्यास प्रत्येक उशिरासाठी विनावेतन रजा वापरली जाईल. रेल्वे वाहतूक किंवा आकस्मिक कारणांमुळे उशीर झाल्यास माफ केले जाणार आहे. मंत्रालयात १०.४५ नंतर १२.१५ पर्यत येणारा कर्मचारी व अधिकारी उशिराने येणार समजण्यात येईल. एका महिन्यात तिसऱ्यांदा झालेल्या उशिरास एक नैमित्तिक रजा वजा करण्यात येईल. ती शिल्लक नसल्यास अर्जित रजा, तीही नसल्यास विनावेतन रजा वजा केली जाईल. मात्र वैद्यकीय कारणास्तवची परिवर्तित रजा वजा होणार नाही. तिसऱ्या, सहाव्या, नवव्या उशिरास प्रत्येकी एक नैमित्तिक रजा वजा केली जाणार आहे. मात्र, त्यापुढील प्रत्येक विलंबास एक साधारण (विनावेतन) रजा वजा केली जाईल. एका महिन्यात दोन वेळा ११.१५ पर्यंत विलंब झाल्यास तो माफ असेल.

बातम्या आणखी आहेत...