आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय:हॉटेल, रेस्तरॉ, मॉल्स देखील रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार, येत्या 15 ऑगस्टपासून मिळणार स्वातंत्र्य

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत होते. हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन पूर्ण करत आता 15 ऑगस्टपासून हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार असल्याचा निर्णय दिला आहे.

राज्य शासनाने दिलेल्या निर्णयानुसार 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तरॉ, मॉल्स देखील रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार अशीही माहिती देण्यात आली आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

'आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. त्या निर्बंध कमी करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिलेली आहे. यानुसार आता 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे 14 दिवस झालेले असणे आवश्यक असणार आहे. असे असेल त्यांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी असणार आहे.' अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...