आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचं राज्यपाल कोश्यारींकडून कौतुक:म्हणाले - यह आमदार काम का भी और कामदार भी!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितेश राणेंचे कौतुक केले आहे. 'आमदार काम का भी और कामदार भी! अर्थात हे आमदार कामाचेही आहेत अन् कामदारही आहेत', असे ते म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज तळेरे येथे विजयालक्ष्मी विशवनाथ दळवी महाविद्यालयाच्या मॉडेल कॉलेजचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिले. यावेळा व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांची नावे घेताना राज्यपाल नितेश राणेंबद्दल, 'आपले युवा आमदार' असे म्हणत थांबले. त्यानंतर 'आमदार काम का भी और कामदार भी (कामाचे ही आहेत आणि कामदारही आहेत)', असे म्हणत नितेश राणेंचे कौतुक केले.

मुंबईसंदर्भात कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नितेश राणेंनी राज्यापालांची बाजू घेतली होती. ट्विटरवरुन आपली भूमिका मांडताना नितेश राणेंनी म्हटले होते की, राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना मुंबई महानगरपालिकेची कंत्राटं मिळवून दिली? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात.

नेमके काय म्हणाले होते राज्यपाल?

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, "कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तेव्हा मात्र, नितेश राणे यांनी राज्यपाल काहीच चुकीचे बोलले नाही, असे म्हणत त्यांचे समर्थन केले होते. याच पाठिंब्यामुळे आज राज्यपालांनी विशेष शब्दांमध्ये नितेश राणे यांचे कौतूक केल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...