आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (शिवसेना+राष्ट्रवादी आणि काँग्रेस)च्या 6 महीन्यांपूर्वी बनलेल्या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या मोठ्या निर्णयांमध्ये काँग्रेसला विचारात घेतले जात नसल्याचे काँग्रेसकडून बोलले जात आहे. या आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना मंगळवारी परत एकदा हवा मिळाली, जेव्हा शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’त काँग्रेसचे दोन मोठे नेते, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाना साधण्यात आला. या वादात आता विरोधीपक्षात असलेल्या भाजपनेही उडी मारली आहे. भाजपने म्हटले की, राज्यात कोरोनामुळे दररोज अनेकांचे बळी जात आहे, परंतू सत्तेत असलेल्या सरकारला नागरिकांच्या जीवाची काहीच परवा नाही, त्यांना फक्त आपली सत्ता जाऊ नये, याचीच चिंता आहे.
सामनातून काँग्रेसवर निशाना
'सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन तयार झाले. सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरेंच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहिल हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. शरद पवारांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटतात. त्यांचा अनुभव मोठा, त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे.'
'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा लोभ उद्धव ठाकरेंना नाही. राजकारण अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, इतकेच शेवटी सांगायचे,' असा टोला सामनातून लगावण्यात आला होता.
शिवसेनेने विसरु नये की, ही सत्ता आमच्यामुळे मिळाली आहे- संजय निरुपम
काँग्रेस-शिवसेनेदरम्यान सुरू झालेल्या वादात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतली. एक ट्वीटमधून निरुपम यांनी शिवसेनेवर निशाना साधला. त्यांनी लिहीले,"काँग्रेसला जुनी खाट म्हणत असलेल्या शिवसेनेने विसरु नये की, ज्या सत्तेत ते आता बसले आहेत, ती आमच्यामुळेच मिळाली आहे. काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागत आहेत, मुख्यमंत्री आमच्या नेत्यांना सोडून, सर्वांना भेटतात. सत्तेसाठी किती सहन करायचे ?"
निरुपम यांचे ट्वीट .....
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (शिवसेना+राष्ट्रवादी आणि काँग्रेस)च्या 6 महीन्यांपूर्वी बनलेल्या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या मोठ्या निर्णयांमध्ये काँग्रेसला विचारात घेतले जात नसल्याचे काँग्रेसकडून बोलले जात आहे. या आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना मंगळवारी परत एकदा हवा मिळाली, जेव्हा शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’त काँग्रेसचे दोन मोठे नेते, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाना साधण्यात आला. या वादात आता विरोधीपक्षात असलेल्या भाजपनेही उडी मारली आहे. भाजपने म्हटले की, राज्यात कोरोनामुळे दररोज अनेकांचे बळी जात आहे, परंतू सत्तेत असलेल्या सरकारला नागरिकांच्या जीवाची काहीच परवा नाही, त्यांना फक्त आपली सत्ता जाऊ नये, याचीच चिंता आहे. सामनातून काँग्रेसवर निशाना 'सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन तयार झाले. सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरेंच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहिल हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. शरद पवारांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटतात. त्यांचा अनुभव मोठा, त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे.' 'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा लोभ उद्धव ठाकरेंना नाही. राजकारण अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, इतकेच शेवटी सांगायचे,' असा टोला सामनातून लगावण्यात आला होता. शिवसेनेने विसरु नये की, ही सत्ता आमच्यामुळे मिळाली आहे- संजय निरुपम काँग्रेस-शिवसेनेदरम्यान सुरू झालेल्या वादात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतली. एक ट्वीटमधून निरुपम यांनी शिवसेनेवर निशाना साधला. त्यांनी लिहीले,"काँग्रेसला जुनी खाट म्हणत असलेल्या शिवसेनेने विसरु नये की, ज्या सत्तेत ते आता बसले आहेत, ती आमच्यामुळेच मिळाली आहे. काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागत आहेत, मुख्यमंत्री आमच्या नेत्यांना सोडून, सर्वांना भेटतात. सत्तेसाठी किती सहन करायचे ?" निरुपम यांचे ट्वीट ..... राज्यात लोक मरत आहेत आणि यांना सत्तेत राहण्याचे पडले आहे: भाजप भाजपेचे प्रवक्ते राम कदम म्हणाले की, 'हे लोक जुन्या खाटांबद्दल बोलत आहे. परंतू, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचे आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येचे काहीच देणे घेणे नाही. ते फक्त आपल्या सत्तेचा विचार करत आहेत. ही विचार करण्याची गोष्ट आहे की, इतक्या आपमानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्तेत बसली आहे.' यापूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 'आम्ही सत्ता पाडण्याच्या विचारात नाही. परंतू, महाविकास आघाडी आपल्या अंतर्गत वादामुळेच पडेल.' येथून सुरू झाला बाद... काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला देण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपली नाराजी उघडपणे मांडली होती. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असून, अनेक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नाही, असा मंत्री अशोक चव्हाणांनी आरोप केला होता. तसेच तीनही पक्षांना बरोबरीचं स्थान मिळणं गरजेचं आहे. कारण सरकार तीनही पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं आहे, असं मंत्री अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांनीही आरोप केला होता की, सराकारमध्ये त्यांना डावलण्यात येत आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनीही एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं की, काँग्रेसने जरी महाराष्ट्रात सराकार स्थापन करण्यासाठी समर्थन दिलं असलं, तरी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.'
राज्यात लोक मरत आहेत आणि यांना सत्तेत राहण्याचे पडले आहे: भाजप
भाजपेचे प्रवक्ते राम कदम म्हणाले की, 'हे लोक जुन्या खाटांबद्दल बोलत आहे. परंतू, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचे आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येचे काहीच देणे घेणे नाही. ते फक्त आपल्या सत्तेचा विचार करत आहेत. ही विचार करण्याची गोष्ट आहे की, इतक्या आपमानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्तेत बसली आहे.' यापूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 'आम्ही सत्ता पाडण्याच्या विचारात नाही. परंतू, महाविकास आघाडी आपल्या अंतर्गत वादामुळेच पडेल.'
येथून सुरू झाला बाद...
काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला देण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपली नाराजी उघडपणे मांडली होती. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असून, अनेक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभाग दिला जात नाही, असा मंत्री अशोक चव्हाणांनी आरोप केला होता. तसेच तीनही पक्षांना बरोबरीचं स्थान मिळणं गरजेचं आहे. कारण सरकार तीनही पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं आहे, असं मंत्री अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांनीही आरोप केला होता की, सराकारमध्ये त्यांना डावलण्यात येत आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनीही एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं की, काँग्रेसने जरी महाराष्ट्रात सराकार स्थापन करण्यासाठी समर्थन दिलं असलं, तरी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.