आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीधर निवडणूक आज निकाल:विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात; भाजप, महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची लढत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.

मराठवाडा, पुणे आणि नागपूर येथील पदवीधर, अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघ आणि धुळे स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी मंगळवारी मतदान झाले होते. या निवडणुकीत प्रथमच विक्रमी मतदान झाले.

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser