आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. जे नियम सध्या लागू आहे ते तसेच राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे व्यापारी आणि प्रवाशांच्या निराश झाले आहेत. दुकाने आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे टोपेंनी म्हटले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
लसीकरणावर भर
यावेळी बोलताना राजेश टोपेंनी राज्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचेही सांगितले. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी या केंद्र सरकारकडून मिळवण्याचा राज्य सरकारचा आहे. ऑगस्ट महिन्यात 4 कोटी लसी उपलब्ध होतील. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी आहे. अशी माहिती टोपेंनी दिली आहे. तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यामध्ये प्रवेश देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी असल्याचे टोपे म्हणाले. गेल्या 3 आठवड्यामध्ये रुग्ण संख्या स्थिर आहे. मात्र 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल 3 मध्ये अनेक जिल्हे आहे. उर्वरित 26 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याची माहितीती टोपेंनी दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे निर्बंध शिथिल केले जाणार नसल्याचे टोपे म्हणाले.
लोक असेच वागले तर कठोर निर्बंध लादणार
यावेळी बोलताना राजेश टोपेंनी नियम न पाळणाऱ्या नागरिकांना इशाराही दिला आहे. टोपे म्हणाले की,'कोरोनाची दुसरी लाट हळुहळू ओसरत आहे. मात्र नागरिक बाहेर मोठ्या प्रमाणाक गर्दी करत आहेत. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक जबाबदारीने वागत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या असल्याची माहितीही टोपेंनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.