आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणावरुन वाद:'लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय', राजेश टोपेंचे प्रकाश जावडेकरांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला होता.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता याला राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला होता. तसेच राज्य सरकारला केंद्राने किती लशी पुरवल्या याचा आकडाही त्यांनी सांगितला होता. यासोबतच पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच योग्य प्रकारे केले जात नाही. एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिले जातात. त्याचं व्यवस्थित नियोजन करायला हवे. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे.'

लस वाया जाण्याचे प्रमाण कमी

यावर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजेश टोपे म्हणाले होते की, 'लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.'

बातम्या आणखी आहेत...