आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्यमंत्र्यांचे विधान:विरार रुग्णालयातील दुर्घटना ही राज्य सरकारचा अंतर्गत मुद्दा, ही काही राष्ट्रीय बातमी नाही : राजेश टोपे

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी विरारमधील घटनेवर शोक व्यक्त केला.

शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विरार स्थित विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील आयसीयूमध्ये भीषण आग लागली. या आगीत जवळपास 13 जणांना प्राण गमवावे लागले आहे. यानंतर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावर भाष्य केले आहे. ही दुर्घटना ही राज्य सरकारची अंतर्गत बाब आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी विरारमधील घटनेवर शोक व्यक्त केला. यासोबतच राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, अनेक विषयांबद्दल पंतप्रधनांशी चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

नाशिकमधील घटनेप्रमाणेच येथेही मदत केली जाईल
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींसोबत ऑक्सिजनसंदर्भात चर्चा करणार आहोत. रेमडिसिविरसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. ही घटना (विरार रुग्णालय आग) ही राष्ट्रीय बातमी नाहीय. राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत केली जाणार आहे असे टोपे म्हणाले. तसेच 13 जणांचा मृत्यू झाला ही राष्ट्रीय बातमी नाहीय का? या प्रश्नावर टोपे म्हणाले की, 'राज्य सरकारच्या अंतर्गत आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. यामध्ये महापालिकेकडून 5 लाखांची, राज्य सरकारकडून पाच लाखांची अशी दहा लाखांची मदत देणार आहोत. नाशिकमधील घटनेप्रमाणेच येथेही मदत केली जाईल.

दोषींची सखोल चौकशी केली जाईल
पुढे बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, 'कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणे हे गरजेचे असते. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणामध्ये सखोल चौकशी केली जाणार आहे. 10 दिवसांमध्ये यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. ही घटना दुर्दैवी आहे. मृतांच्या नातेवाईकांसोबत आमच्या सदिच्छा आहेत.'

बातम्या आणखी आहेत...