आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशातच राज्यातील मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

उदय सामंत यांनी याविषयी ट्विट केले आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. ते म्हणाले की, ''गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.'' असे ते म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...