आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Home Minister Anil Deshmukh Claims, Case Filed In Mumbai Not Yet Given To CBI; Father Opposes Riya's Appeal In Supreme Court

सुशांत आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट:सुशांत प्रकरणाचा तपास अजुनही मुंबई पोलिसांकडेच, आमच्याकडे जो एडीआर दाखल करण्यात आलाय तो सीबीआयकडे हस्तांतरित झालेला नाही - गृहमंत्री अनिल देशमुख

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाने सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केस पाटणामधून मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे

सुशांतच्या वडिलांच्या केसवर सीबीआयनेही रिया आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध वेगळी केस दाखल केली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दावा केला आहे की मुंबईत दाखल करण्यात आलेला अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट (एडीआर) अद्याप सीबीआयकडे हस्तांतरित झाला नाही. आज या प्रकरणात राज्य सरकारकडून या संदर्भातील अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल. सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली त्यावेळी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सीआरपीसी कलम 174 अन्वये एडीआर दाखल केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, सध्या मुंबई पोलिसांद्वारे तपास केला जात आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने हा खटला घेतलेला नाही. मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे मात्र हे चुकीचे आहे.

सीबीआयने सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात दाखल केलेला खटला हातात घेतला आहे
अनिल देखमुख म्हणाले की, 'सुशांत सिंगच्या वडिलांनी पाटणा येथे दाखल केलेल्या खटल्याची चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा बिहार सरकारचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारल्यानंतर हे केले गेले. स्पष्टपणे दोन वेगळे- वेगळे प्रकरणे आहेत. मुंबई पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सीबीआयने ते ताब्यात घेतलेले नाही. आता चेंडू सुप्रीम कोर्टाकडे आहे. ज्याची सुनावणी 19 ऑगस्टला होणार आहे.

मुंबई पोलिसांजवळ हा तपास करण्याचा अधिकार आहे
देशमुख यांनी पुनरुच्चार केला की मुंबई पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करीत आहेत आणि ते योग्य दिशेने वाटचाल करत आहेत. ते म्हणाले, 'बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 12 आणि 13 अन्वये पाटण्यात गुन्हा दाखल केला असला तरी, ज्या पोलिसांच्या हद्दीत हा गुन्हा नोंदविला गेला आहे, केवळ त्या पोलिसांकडूनच याचा तपास व चौकशी केली जाऊ शकते.'

रियाच्या अर्जावर सुशांतच्या वडिलांचा सुप्रीम कोर्टात जबाब
सुशांतच्या वडिलांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रियाच्या ट्रान्सफर अर्जाला विरोध दर्शवण्यात आला आहे. यासोबतच ते म्हणाले आहेत की, रिया या प्रकरणात सामील असलेल्या साक्षीदारांवर दबाव टाकू शकते. तिने सिद्धार्थ पिठानीवर दबाव आणला आहे. त्यामुळे रियाचा अर्ज फेटाळून लावायला हवा. जेव्हा रियाने स्वत: सीबीआय चौकशीची मागणी केली होती, तेव्हा ती आता हे प्रकरण का टाळत आहे. या प्रकरणाची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.

सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येपासूनच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विविध लोक व संघटनांकडून केली जात होती. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध बिहार पोलिसात सीआरपीसीच्या कलम 154 अन्वये गुन्हा नोंदविला होता. हे प्रकरण गृहमंत्र्यांनी सीबीआयकडे देण्याचा दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...