आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बिहार विधानसभा निवडणूक:जदयूने माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेचे तिकीट कापल्यावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानंतर पांडे यांनी सोशल मीडियावरून भावना व्यक्त केल्या

ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या पोलिस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन जदयूमध्ये प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकीचे तिकीट देणे, हा संबंधित पक्षाचा विषय असल्याचे देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख म्हणाले की, "गुप्तेश्वर पांडे यांना बिहार विधानसभा निवडणुकीचे तिकीट देणे, हा संबंधित पक्षाचा विषय आहे. आम्ही विचारले होते भाजप नेते पांडेंचा प्रचार करणार का? याच प्रश्नाच्या भीतीपोटी पांडेंना तिकीट दिले नसावं, असे अनिल देशमुख म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयूची युती आहे.

दरम्यान पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानंतर पांडे यांनी सोशल मीडियावरून भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ‘शुभचिंतकांच्या फोननी मी हैराण झालोय, त्यांची चिंता मी समजू शकतो. मी सेवामुक्त झाल्याने निवडणूक लढवेन, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु मी यावेळी निवडणूक लढवत नाही. माझं आयुष्य संघर्षमय होतं. मी जीवनभर जनतेची सेवा करत राहीन. कृपया संयम बाळगा आणि मला फोन करु नका”

ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या पोलिस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन जेडीयूमध्ये प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे यांना मोठा धक्का बसला आहे. जेडीयूने आपली 115 जणांची उमेदवार यादी प्रसिद्ध केली, मात्र बक्सरमधून निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांचे नाव यादीत नाही. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.