आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय:राज्यातील बारावीच्या निकालाचा प्रश्न सुटला, सीबीएसईप्रमाणे 30-30-40 फॉर्म्युल्यानुसार दिले जाणार गुण

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. केली आहे. यानुसार सीबीएसई पॅटर्नचा वापर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

यानुसार इयत्ता दहावीच्या गुणांचे 30 टक्के वेटेज, इयत्ता अकरावीच्या गुणांचे 30 टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे 40 टक्के वेटेज यावरुन बारावीचा अंतिम निकाल दिला जाणार आहे. या फॉर्म्युलामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुणांवरुन मुल्यमापन केले जाईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)च्या धर्तीवर राज्य सरकार आणि राज्य मंडळाने समन्वय समितीच्या माध्यमातून हा फॉर्म्युला तयार केला आहे. यासोबतच जे विद्यार्थी निकालाने असमाधानी असतील त्यांना कोविड 19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुक्षिततेच्या दृष्टीने विचार करत बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी सर्व संबंधीत घटकांशी चर्चा करून मुल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली.

बातम्या आणखी आहेत...