आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशमुखांनी सोडले मौन:न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही, अनिल देशमुखांनी सांगितले ईडी कार्यालयात गैरहजर राहण्याचे कारण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीने देशमुखांना पाच वेळा बजावला आहे समन्स

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावले आहेत. मात्र, पाच वेळा समन्स बजावूनही ते एकदा देखील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. एवढे समन्स बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले होत नाहीत असा प्रश्न होता. दरम्यान आता स्वतः देशमुखांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे.

न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमूख यांनी स्पष्ट केली आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा देखील दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे आणि त्यांना सहकार्य करणार आहे.' असे अनिल देशमुखांनी स्पष्ट केले आहे.

ईडीने देशमुखांना पाच वेळा बजावला आहे समन्स

  1. 25 जून रोजी देऊन 26 जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले.
  2. दुसरे समन्स तात्काळ 26 जून रोजी देऊन 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
  3. तिसरे समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
  4. चौथे समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले.
  5. पाचवे समन्स 16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...