आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra : If I Have Committed A Crime, I Am Ready To Be Punished, Otherwise I Should Be Given A Clean Chit, Pratap Sarnaik's Demand In Vidhansabha

पावसाळी अधिवेशन:...नाहीतर मला क्लिन चिट द्यावी, माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप; सरनाईकांची सभागृहात मोठी मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भुजबळ, अनिल देखमुख करणार अशी धमकी दिली जातेय

मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे. मात्र जर गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाकडून पर्यायाने राज्य सरकारकडून क्लीनचिट देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी सभागृहात बोलतना केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे ते अडचणींमध्ये सापडलेले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सभागृहातच आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल दाद मागितली.

यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, 'माझ्यावर आरोप करणे म्हणजे थेट सरकारवर आरोप आहेत. घोटाळा झालेला आहे की नाही हे तपासणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. एमएमआरडीए हा विभाग सुद्धा राज्य सरकारकचे आहे. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होत आहे. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र जर गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाकडून पर्यायाने राज्य सरकारकडून क्लीनचिट दिली जावी.

भुजबळ, अनिल देखमुख करणार अशी धमकी दिली जातेय
यावेळी बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, 'मला ईडीकडून विनाकारण देण्यात येत आहे. भुजबळ, अनिल देशमुख करेन अशी धमकी देण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या घोटाळ्याचा तपास हा ईडी करत आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझ्यावर आरोप होत आहे म्हणजे हे एक प्रकारे सरकारवर आरोप होत आहेत. याविषयी मी आता मी गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिले आहे. त्यामध्ये घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईक अटक झाली पाहिजे पण जर घोटाळा झाला नसेल तर तो अहवाल बाहेर आणा अन्यथा क्लिनचिट द्या. असे मी या पत्रात लिहिलेय.'

बातम्या आणखी आहेत...