आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा 9 लाखांच्या पार, तर देशात आता एकूण 42 लाख 36 हजारांपेक्षा अधिक रुग्ण; तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला भारत

मुंबई / नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडूत सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करून रेल्वे प्रवास करताना लोक... - Divya Marathi
तामिळनाडूत सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करून रेल्वे प्रवास करताना लोक...
  • कोरोना संक्रमितांचा आणि चाचण्या घेण्याच्या बाबतीतही तिसऱ्या क्रमांकाचा देश भारत

देशात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत जाण्याचा प्रकार सुरूच आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे भारत जगातील तिसरा सर्वाधिक कोरोना रुग्णांचा देश बनला आहे. देशात सोमवारी कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 42 लाख 36 हजार 961 झाली आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे, यातील 32 लाख 78 हजार 999 लोक बरे होऊन घरी पोहोचले आहेत. तर एकूणच 8 लाख 82 हजार 306 कोरोनाग्रस्तांवर सध्या विविध राज्यांमध्ये उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी covid19india.org वरून आहे.

महाराष्ट्रात 9 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्र अजुनही देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला राज्य आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची एकूण आकडेवारी 9 लाखांच्याही पुढे गेली आहे. रविवारीच कोरोनाचे 23,350 नवीन रुग्ण सापडले होते. यासोबतच, राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 9 लाख 7 हजार 212 झाली आहे. आरोग्या विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात संक्रमणाचे 3 लाख 76 हजार 587 प्रकरण समोर आले. तर जुलैमध्ये पूर्ण महिना 2 लाख 41 हजार 820 आणि जूनमध्ये 1 लाख 4 हजार 748 नवीन रुग्ण सापडले होते. राज्यात पहिला कोरोना रुग्ण पुण्यात 9 मार्च रोजी सापडला होता. तर 17 मार्च रोजी मुंबईत पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची नोंद झाली होती.

टेस्टिंगच्या बाबतीतही भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश

दरम्यान, सोमवारी देशात कोरोना टेस्टचा आकडा 5 कोटींच्या पुढे गेला आहे. गेल्या 24 तासांत 7 लाखांपेक्षा अधिक लोकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. एकूणच 5 कोटी कोरोना चाचण्यांपैकी 8.47% लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. आता देशात प्रत्येकी 10 नागरिकांपैकी 35,842 लोकांची कोरोना टेस्ट घेतली जात आहे. यात 3,055 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. टेस्टिंगच्या बाबतीत चीन सर्वात पुढे आहे. चीनमध्ये जवळपास 16 कोटींपेक्षा अधिक कोरोना टेस्ट घेण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत 8 कोटी 74 हजार लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. या आकडेवारीनुसार भारत सर्वाधिक टेस्ट घेणारा तिसरा देश बनला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser