आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता:अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नी राज्य सरकारने मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपावली आहे. त्यानुसार या 2 मंत्र्यांचा उद्या बेळगाव दौरा नियोजित आहे. मात्र, हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापरिनिर्वाण दिनी वाद नको

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावर भाष्य केले आहे. आज पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विनाकराण यासंदर्भात नवे वाद सुरु करणे चुकीचे आहे. उद्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा हा महापरिनिर्वाणासाठी होता. मंत्र्यांनी ठरवले तर त्यांना जाण्यापसून कोणी रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद तयार करायचा का? हा महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात विचार करुन मुख्यमंत्री अंतिम निर्णय देतील.

अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील

पुढे फडणवीस म्हणाले, आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कोणीही घाबरत देखील नाही. मात्र, उद्या महापरिनिर्वाण दिन असल्याने काय करावे, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.

फडणवीसांच्या या भूमिकेमुळे मंत्र्याच्या उद्याच्या बेळगाव दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांनीच हा दौरा पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेल आहे.

कोर्टातून न्याय मिळेल

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कर्नाटक किंवा महाराष्ट्र निर्णय घेऊ शकत नाही. सगळा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. या संदर्भात नव्याने वाद तयार करणे योग्य होणार नाही. महाराष्ट्राने ताकदीने आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे आपल्याला सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल यावर विश्वास ठेवायला हवा.

अद्याप दौरा रद्द नाही

दुसरीकडे, मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही उद्याचा दौरा निश्चित केलेला आहे. सध्या आम्ही दौरा रद्द केल्याबाबत अधिकृत कळवलेले नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यांसोबत चर्चा करुन ते जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेऊ.

बातम्या आणखी आहेत...