आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावाद चर्चेने सोडवा:महाराष्ट्र-कर्नाटकप्रश्नी शिंदे-फडणवीस-बोम्मई यांची दिल्लीत बैठक, मंत्र्यांची समिती नेमणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील धगधगत्या सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फुंकर मारली आहे. बुधवारी दिल्लीत शहा यांच्या संसदेतील कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक झाली. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणतेही दावे करू नये, तसेच लोकशाहीत वाद रस्त्यावर सोडवता येत नाहीत. परस्पर चर्चेने तोडगा काढला जातो, असा सल्लाही शहा यांनी उभय राज्यांना दिला. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र सरकारला या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य समजले आहे. गृहमंत्र्यांसमोर झालेल्या चर्चेदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्राच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहिलो. सीमाभागातील मराठी भाषकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यासोबतच दोन्ही राज्यांत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात येणार आहे, असे शिंदे म्हणाले.

सीमाप्रश्नी बैठकीतील महत्त्वाचे निर्णय { सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत उभय राज्यांनी दावा करू नये { दोन्ही राज्यांतील तीन-तीन मंत्र्यांची समिती स्थापन करणार. { याशिवाय आयपीएस अधिकाऱ्यांचीही एक समिती नेमण्याचा { कर्नाटकात प्रवेशापासून मंत्र्यांना रोखणार नाही

‘ते’ ट्विटर हँडल बोम्मई यांचे नाही ज्या ट्विटर हँडलवरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने महाराष्ट्राविरोधात वक्तव्ये केली जात होती, ते ट्विटर हँडल बोम्मईचे नसल्याचे या भेटीत समोर आले. या बनावट ट्विटर हँडलविरोधात एफआयआर दाखल करणार येईल, असे आश्वासन बोम्मई यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...