आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद:आता महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे गप्प का? भाई जगताप यांचा संतप्त सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेव्हा हे देवेंद्र फडणवीस यांचे चमचे कंगनाला झाशीची राणी म्हणत होते

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याविषयी वक्तव्य केले होते. वक्तव्यावरुन महाराष्ट्रात तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आता भाजपला खोचक टोला लगावला आहे. 'महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे आता गप्प का?,' असा सवाल जगताप यांनी केला आहे.

'भाजपचे कर्नाटकातील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दात निंदा करतो. सवदी यांना कळायला हवे की ज्या महाजन समितीचा हवाला ते देत आहेत, तो अहवाल काय आहे? सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला मुंबईचा नाही. तर तो बेळगाव आणि जवळपासच्या मराठी भाषिक भागांचा आहे. मुंबईविषयी ते एवढे बेजबाबदार बोलू शकतात. मला तर आश्चर्य वाटतेय की, भाजपचे चमचे, भाजपचे नेते, देवेंद्रे फडणवीस जे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतात. त्यांना हे दिसत नाही का? असा खोचक सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.

पुढे जगताप फडणवीस तसेच भाजपवर टीका करत म्हणाले की, 'मुंबईविषयी कर्नाटकातील भाजपचा उपमुख्यमंत्री बोलत आहेत आणि आपण मुंबईविषयी एक शब्द देखील काढलेला नाही. गप्प बसला आहात. कंगना रनोटसारख्या दोन टक्क्यांच्या कलाकारांने मुंबईला पाकिस्तान म्हटले होते, तेव्हा हे देवेंद्र फडणवीस यांचे चमचे तिला झाशीची राणी म्हणत होते. आज भाजप उपमुख्यमंत्री मुंबईविषयी बोलत आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहात. महाराष्ट्र व मुंबईविषयी तुमचे हेच प्रेम आहे का?' असा सवालही भाई जगताप यांनी विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...