आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडव्याचा उत्साह:राजकीय नेत्यांच्या घरी गुढीपाडव्याचा उत्साह, गुढी उभारत मराठी नव वर्षांचे स्वागत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली 2 वर्ष गुढीपाडवा उत्सहात साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा देशात आणि राज्यात कोरोनाचे निर्बंध उठवण्यात आले आहे. आणि यानंतर राज्यात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. यात राजकीय नेत्यांनीदेखील सकाळीच गुढी उभारत मराठी नव वर्षांचे स्वागत केले आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली. यावेळी पार्थ पवार यांनी पारंपारिक पोषाख परिधान करत मास्कही लावला होता.

यावेळी पार्थ पवार यांनी पारंपारिक पोषाख परिधान करत मास्कही लावला होता.

मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये नात भुवनेश्वरी सोबत उभारली मराठी नववर्षाची गुढी, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी भुजबळ यांनी ढोल वाजवत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या

आमदार रोहित पवार यांनी कुटुंबीयांसमवेत त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली, कुटुंबीयांसोबत त्यांनी गुढीचे पूजन केले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गुढी पाडव्या निमित्त कोल्हापुरात आहेत. त्यांच्या कोल्हापूर येथील घरी पत्नीसह गुढीची विधीवत पूजा केली.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या जालन्यातील निवासस्थानी गुढी उभारली, यावेळी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी आणि मुलगा आमदार संतोष दानवेही उपस्थित होते.

भाजप आमदार श्र्वेता महाले यांनी आपल्या निवासस्थानी पतीसह गुढीची पुजा केली. यावेळी दोघांनी पारंपारिक पोषाख परिधान केला होता.

बातम्या आणखी आहेत...