आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचा जीव भांड्यात:आघाडीने 5 जागा दिल्याने क्रॉस व्होटिंगची भीती टळली; खडसे, पंकजा मुंडेंना दिली होती काँग्रेसने ऑफर

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंना दिली होती काँग्रेसने ऑफर

अशोक अडसूळ
विधान परिषदेच्या ६ ऐवजी ५ जागा लढवण्याचा सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निर्णय घेतला. जागांचा पेच मिटल्याने शिवसेना नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याबरोबरच भाजपच्या नेत्यांचाही जीव भांड्यात पडला. कारण या निवडणुकीत क्राॅस व्होटिंगची भाजप नेत्यांना भीती होती.

सह्याद्री अतिथीगृहात आज आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आघाडीने सहा जागा लढवण्याचा प्रस्ताव ठेवला. सहाव्या उमेदवाराला कमी पडणाऱ्या १४ ते २० मतांची जबाबदारी काँग्रेस घेईल, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचे अजित पवार व शिवसेनेच्या अॅड. अनिल परब यांनी जोरदार विरोध केला. मुख्यमंत्री स्वत: उमेदवार आहेत, त्यामुळे सेना कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, असे परब स्पष्ट केले. तर आम्हाला पहिल्या पसंतीची ३२-३२ मते मिळवण्यात अडचण असल्याचे अजित पवार म्हणाले.

आश्चर्य म्हणजे काँग्रेसने मागच्या आठवड्यात भाजपतील नाराज नेते एकनाथ खडसे व पंकजा मुंडेंना सहाव्या जागेची आॅफर दिली होती. मात्र, दोघांनीही ती नाकारली. प्रदेश काँग्रेसला दिल्लीहून राजेश राठोड यांचेच नाव कळवले होते. मात्र, शक्य असल्यास सहाव्या उमेदवाराचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची मुभा दिली होती.

खडसे, पंकजा यांनी उभे राहण्यास नकार दिला. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने जाणीवपूर्वक सहावा उमेदवार पंकजा मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यातला निवडला. सहाव्या जागेसाठी कमी पडणारी मते बीडचे राजकिशोर ऊर्फ पापा मोदी स्वबळावर वळवू शकणारे उमेदवार होते. त्यामुळेच बाळासाहेब थोरात यांना त्यांची निवड केली होती, पण प्रदेश काँग्रेसची दोन्ही गणिते जमून आली नाहीत. सहावा उमेदवार मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून काहीएक आश्वासन पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा इरादा होता. मात्र, सह्याद्रीवर झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेसच्या हाती काही लागले नाही.

आघाडीच्या बैठकीकडे भाजपचे लक्ष

आघाडीच्या बैठकीकडे भाजप नजर लावून होती. कारण, आघाडीने सहावा उमेदवार दिला असता तर नाराज पंकजा मुंडे यांच्या गटातील काही भाजप आमदार क्राॅस व्हाेटिंग करतील, अशी भाजपला भीती होती. काँग्रेस ५ जागांवर सहमत झाल्याने सेना नेत्यांनी जसा सुटकेचा नि:श्वास सोडला तसा भाजप नेत्यांचाही सोडला आहे.

बातम्या आणखी आहेत...