आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध कोरोनाविरुद्ध:राज्यात 1 जूननंतरही लॉकडाऊन कायम; रुग्णसंख्येनुसार काही भागात निर्बंध शिथिल; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॅाकडाऊन कायम ठेऊन निर्बंध हटवण्याचा सरकारचा विचार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेन‘ अंतर्गत लॅाकडाऊन लागू केला आहे. अनेक गोष्टींवर निर्बंध देखील लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता आणण्याचा विचार राज्य सरकार आता करत आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चा खाण्यात आली. ज्या जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. अश्या जिल्ह्यातील निर्बंध हटवण्यात यावे अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १०ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकर मायकोसीसचा धोकाही वाढतो आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्ण संख्या कमी कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. मात्र आपल्याला अजून काळजी घेणे भाग आहे. एकदम लॉकडाऊन न उठवता तो 1 जूननंतर वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने आरोग्य विभागास निर्देश दिले आहेत. पण कोणते निर्बंध शिथिल करायचे याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्स सोबत चर्चा करणार आहेत त्यानंतरच निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात वाढत असलेले मुक्यरमायकोसीसचे रूग्ण, नविन स्ट्रेन, राज्याचा रूग्णवाढीचा दर, बेडची उपलब्धता, लसीकरण आणि तोंडावर आलेला पावसाळा अश्या काही प्रमुख मुद्द्यांना घेऊन मुख्यमंत्री टास्क फोर्स सोबत चर्चा करणार आहेत. लसीकरणाबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली यामध्ये विशेषतः दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात यावे असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

मुंबईत निर्बंध शिथिल होणार-
मुंबईत रुग्णवाढीचा दर मंदावला आहे. मुंबईत लसीकरणावर प्राधान्याने भर देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत १२०० च्या. आसपास नवे रूग्ण सापडत असले तरी रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील तेव्हढेच आहे. मुंबईत कोरोनरी रूग्णसंख्येत घट झालेली आहे त्यामुळे आता शिथिलता आणून आम्हाला व्यवसाय करू द्यावे अशी मागणी व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...