आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकिंग न्यूज:महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार लॉकडाउन; त्यातही होऊ शकते वाढ! 14 तारखेनंतर दिला जाणार तपशील

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, वर्क फ्रॉम होम सुरू ठेवा -सीएम

महाराष्ट्रातील लॉकडाउन 14 एप्रिलनंतरही असाच लागू राहणार असल्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. हा लॉकडाउन कसा राहील, परीक्षा आणि उद्योगांसह छोट्या व्यापारांचे काय याचा तपशील 14 एप्रिलनंतर जारी केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यानंतर उठलेल्या शंका आणि चर्चांना विराम लावण्यासाठी मुख्यमंत्री जनतेसमोर आले. सोशल मीडियावरून लाइव्ह संवाद साधताना त्यांनी सर्व अफवा थांबवत हा लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढत असल्याचे जाहीर केले.

'किमान' जोर देऊन बोलतोय, किमान 30 एप्रिलयपर्यंत राहणार लॉकडाउन -सीएम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता हा लॉकडाउन 30 एप्रिल पर्यंत लागू राहणार आहे. लक्षात ठेवा, किमान हा शब्द मी मुद्दाम जोर देऊन बोलतोय. याचा अर्थ 30 एप्रिल पर्यंत सर्वच नागरिकांनी आप-आपली जबाबदारी लक्षात घेऊन लॉकडाउनचे पालन केले. परिस्थिती नियंत्रणात आली तरच यानंतर लॉकडाउन मागे घेण्याचा विचार केला जाईल. अन्यथा हा लॉकडाउन 30 एप्रलिनंतर सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला जाउ शकतो.

अत्यावश्यक सेवा अशाच सुरू राहतील...

मुख्यमंत्री नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले- राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उलट सुलट बातम्या येण्यापेक्षा आपणंच खरं काय ते सांगावं याउद्देशाने मी तुमच्यासमोर आलो आहे. आपण संचारबंदीपासून सुरुवात केली आणि लॉकडाउनपर्यंत आलो. आपण समोरून रुग्ण येण्याची वाट पाहत नाहीत तर घरी जाऊन लोकांची तपासणी करतो आहोत. मुंबई जेथे रुग्ण सापडले तो भाग आपण सील केला. 60 पेक्षा अधिक वय आणि आधीपासून मधुमेह, किडनी विकार अशा रोगग्रस्तांनाच कोरोनाचा धोका आहे. हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल झाले होते. महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवला जात असला तरीही यात अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरूच राहतील अशी खात्री मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...