आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन 4.0:राज्याची नवीन नियमावली जाहीर, रेड झोन वगळता इतर भागात व्यवहार सुरू; 22 मेपासून होणार अंमलबजावणी

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रेड, नॉन रेड झोनमध्ये विभागला गेला महाराष्ट्र, लॉकडाउनच्या नवीन गाइडलाइन जारी
 • येथे जाणून घ्या रेड झोन आणि नॉन रेड झोनमध्ये काय सुरू आणि काय राहील बंदच

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात रेड झोनव्यतिरिक्त इतर भागातील नागरिकांना काही प्रमाणात मोकळा श्वास घेता येणार आहे. लॉकडाऊन ४.० साठी राज्य सरकारने मंगळवारी नवीन नियमावली जाहीर केली असून आता पूर्वीच्या रेड, ऑरेंज आणि ग्रीनऐवजी रेड झोन, कंटेनमेंट झोन आणि इतर भाग अशी वर्गवारी केली आहे. नव्या नियमानुसार संपूर्ण राज्यात संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. ही नवीन नियमावली शुक्रवार,दि.२२ पासून लागू होणार आहे.

मागील कालावधीत शासनाचे आदेश असतानाही स्थानिक प्रशासनाला आदेश काढण्याची परवानगी दिली असल्याने अनेक वेळा गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळेच नव्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाला कोणतेही आदेश काढायचे असल्यास आता मुख्य सचिवांची परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

इतर भागात दुकाने, बाजारपेठा सकाळी ९ ते सायं.५ पर्यंत खुले

क्रीडा संकुल, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक वापरासाठी सुरू ठेवता येणार; परंतु सामूहिक कार्यक्रमांना बंदी, सर्व प्रकारची खासगी आणि सरकारी वाहतूक सेवा सुरू. दुचाकीवर एकास, तीनचाकीमध्ये चालक अधिक दोन आणि चारचाकीमध्ये चालक अधिक दोन व्यक्तींनाच परवानगी असेल, आंतरजिल्हा बससेवा फक्त ५० टक्के क्षमतेनेच चालवण्यास परवानगी, सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.

गर्दी टाळण्यासाठी रेल्वे विमान, मॉल बंदच

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने पूर्वी घातलेले काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. यात रेल्वे, विमान, मेट्रो सेवा, शाळा, कॉलेज. अन्य शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था, व्यावसायिक हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, बार, ऑडिटोरियम, सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, स्पोर्ट‌्स, धार्मिक गोष्टींचा समावेश आहे.

रेड झोनमध्ये दस्त नोंदणी, उत्तरपत्रिका तपासणीसाठी मुभा

सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यात येणार असून इतर दुकानांबाबत स्थानिक प्रशासन मुख्य सचिवांशी चर्चा करून निर्णय घेणार. परवानगी दिलेली असल्यास दारूची दुकाने सुरू ठेवता येणार असून होम डिलिव्हरी करता येईल. चारचाकीत केवळ चालकासह ३ जण.

 • सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद
 • 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये
 • डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
 • मेट्रोसेवा बंद राहणार
 • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद
 • हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
 • सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
 • रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी, जीवनावश्यक सेवा वगळता

नॉन रेड झोनमध्ये या गोष्टींना परवानगी

नॉन रेड झोनमध्ये मान्य असलेल्या गोष्टी करण्यासाठी कुणालाही सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही. या भागात स्पोर्ट्स काँप्लेक्स, मैदान आणि सार्वजनिक ठिकाणे खुली राहतील. परंतु, या ठिकाणी गर्दी न करता केवळ मोजक्या लोकांना प्रॅक्टिस करता येईल. ज्या इव्हेंटमध्ये लोकांची गर्दी होईल असे इव्हेंट आयोजित करता येणार नाहीत. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून फिझिकल एक्सरसाइज करता येईल. नॉन रेड झोनमध्ये मार्केट आणि दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. परंतु, जास्त गर्दी होत असल्यास आणि सोशल डिस्टंसिंग पाळले जात नसल्यास ते बंद केले जातील.

सर्व सरकारी कार्यालये सुरू केले जाऊ शकतील. त्यामध्ये सब-रेजिस्ट्रार आणि आरटीओंचा समावेश आहे. विद्यापीठ, महाविद्याये खुले राहतील परंतु या ठिकाणी शिकवले जाऊ शकणार नाही. येथे केवळ उत्तर पत्रिका तपासणी आणि निकाल या कामांसाठी 5 टक्के स्टाफ काम करेल.

बातम्या आणखी आहेत...