आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र सतत प्रयत्न करुनही लोक ऐकण्यास तयार नाहीत. दादरच्या भाजी मंडीत याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले. येथे हजारो लोक भाजीमंडीत पोहोचले होते. विशेष म्हणजेच भाजी मंडीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात होते, तरीही ते गर्दी रोखण्यासाठी अपयशी ठरले. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संक्रमणाचे 8,938 नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात 7 व्या क्रमांकावर
महाराष्ट्रात एका दिवसात 56,286 कोरोना रुग्ण आढळले आहेत तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 36130 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईमध्येही एका दिवसात 8,938 प्रकरणे समोर आली आणि 25 जणांचा मृत्यू झाला. राज्यात 5,21,317 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात 7 व्या क्रमांकावर आहे. आता यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिकेत समोर आली आहेत. आतापर्यंत एकूण 26,49,757 रुग्ण बरे झाले आहेत तर 57,028 जणांचा जीव गेला आहे. राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 32,29,547 पर्यंत गेली आहे.
पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत जमली होती गर्दी, मागितली माफी
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकांचा प्रचार करण्यासाठी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले होते. येथे त्यांनी अनेक सभा घेतल्या, यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. भाजपचे नेते कल्याण काळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी अजित पवार स्वतः गेले होते. तेथेही प्रचंड गर्दी जमली. दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. एका दुसऱ्या ठिकाणी पवार मतदारांना संबोधित करत होते. यानंतर अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मीडियाने पवारांना प्रश्न करण्यास सुरुवात केली, यानंतर अजित पवारांनी चुकी स्वीकारली आणि माफी मागितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.