आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात कोरोना:दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी, आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घोषणेची शक्यता

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रातून रवाना

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र तरीही कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. गेल्या 24 तासांदरम्यान येथे 58,924 नवीन रुग्ण समोर आले आहेत. या दरम्यान 351 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर आता मानले जात आहे की, दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात टोटल लॉकडाऊन लागू केले जाऊ शकते.

हे संकेत राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत या संदर्भात निर्णय घेऊ शकतात. ते म्हणाले, 'आम्ही दिल्लीत 6 दिवसांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचा अभ्यास करत आहोत.' आज ठाकरे सरकारमधील मंत्रिमंडळाचीही बैठक आहे. या बैठकीनंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

मंत्री म्हणाले, 'संपूर्ण लॉकडाऊनचा सर्वात जास्त विरोध छोटे व्यापारी करत होते, मात्र आता ते आणि जीवनावश्यक वस्तुंचे दुकानदारही संपूर्ण लॉकडाऊनची मागणी करत आहेत. काही जिल्ह्यांमध्येही लॉकडाऊनची मागणी केली जात आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना याविषयी सांगितले आहे. ते लवकरच सर्वपक्षिय बैठक घेऊन याविषयावर चर्चा करतील. यानंतर संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले जाऊ शकते' मंत्री छगन भुजबळ यांनीही संपूर्ण लॉकडाऊनवर जोर दिला आहे.

देशातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रातून रवाना
ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी देशातील पहिली ऑक्सीजन एक्सप्रेस रिकामे सात टँकर घेऊन सोमवारी रात्री कळंबोली येथून विशाखापट्टणमला रवाना झाली. या रेल्वेला परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा झेंडा दाखवला. विशाखापट्टणममधून ऑक्सिजन भरून टँक पुन्हा तळोजा येथे येतील. पहिली फेरी यशस्वी झाल्यास आगामी काळात झारखंडमधील बेल्लारी आणि जमशेदपूरसारख्या देशाच्या विविध भागातून ऑक्सिजनही आणला जाईल.

बातम्या आणखी आहेत...