आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Lockdown Update; Mumbai Pune Coronavirus Cases Update | Maharashtra Nagpur Nashik Corona Cases District Wise Today News 19 April; News And Live Updates

कोरोना राज्यात:जगातील सर्वात जास्त नवीन सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात; दिल्लीसह इतर 6 राज्यातील येणाऱ्या लोकांना नेगेटिव्ह RT-PCR अनिवार्य

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 60 हजारांवर मुलांना कोरोना संक्रमनाची लागण

महाराष्ट्र राज्यात कोरोना संक्रमनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 68,631 नवीन सक्रीय रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्र राज्य कोरोनाचे नवीन सक्रीय रुग्ण आढळण्यात जगात सर्वात वर पोहचला आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र राज्याने गेल्या चोवीस तासांत अमेरिका, ब्राझील आणि फ्रान्सलादेखील मागे टाकले आहे.

वर्ल्डमीटरच्या मते, महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या नवीन रुग्णांच्याबाबतीत पहिल्या नंबरवर पोहचला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोना महामारीमुळे मरण पावले आहे. हा मृतांच्या आकड्यांचा अंदाज बांधल्यास जगातील 209 देशांपेक्षा जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहे.

दिल्लीसह इतर राज्यातील येणाऱ्या लोकांना नेगेटिव्ह RT-PCR अनिवार्य
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारने दिल्ली, गुजरातसह इतर सहा राज्यातील प्रवाशांना राज्यात RT-PCR नेगटिव्ह चाचणी अनिवार्य केली आहे. वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे.

या देशांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र्रात

महाराष्ट्र 68,631 तुर्की 55,802 अमेरिका 43,174 ब्राझील 42,937 फ्रान्स 29,344

बातम्या आणखी आहेत...