आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,288 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण येण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत एका दिवसांत 50,329 नवे रुग्ण आढळले आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात सर्वात वर असून जगातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यासोबतच दिवसा मास्क, सोशल डिस्टेंसिंग, रात्रीला संचारबंदी आणि संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. राज्यात लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु असूनदेखील कोरोना प्रकरणामध्ये घट येत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला अधिक कठोर पाऊल उचलण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन प्रभावी नाही - केंद्र
इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्यानुसार, केंद्र सरकारचा असा दावा आहे की, कोरोनाला रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन पुरेसा प्रभावी नाही. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषणने राज्याच्या मुख्य सचिवांना लिहलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, राज्य सरकारचे लक्ष लॉकडाऊनवर न राहता कडक आणि प्रभावी नियंत्रणावर केंद्रीत असायला हवे. पत्रात पुढे त्यांनी म्हटले की, रात्रीची संचारबंदी, वीकेंड लॉकडाऊन जसे पर्यायाचा कोरोना संक्रमनांवर फारच मर्यादित प्रभाव पडतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक आणि प्रभावी नियंत्रणावर रणनीती आखयला हवी.
25 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाची मागणी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना 25 वर्षांवरील लोकांना लसीकरणाची परवानगी द्यावी यासाठी पत्र लिहले आहे. पत्रानुसार, उद्धव ठाकरे यांनी मोठ्या संख्येंने युवकांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.
केंद्र सरकारने एक तज्ञाची टीम महाराष्ट्रात पाठवली,
राज्यात कोरोना महामारीच्या बिघडलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने तज्ञांची 30 पथके महाराष्ट्रात पाठविली आहेत. बिघडत जाणारी परिस्थिती नियंत्रणात कशी आणायची? संसर्ग कसा रोखायचा? कोणती नवीन रणनीती बनवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे ही पथके शोधणार आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीत
महाराष्ट्रात राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना महामारीचे 47,288 नवीन प्रकरणे समोर आली. दरम्यान, 26,252 लोक बरे झाले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.