आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा क्रांती मोर्चा आंदोलन:आठ दिवसांत गनिमी काव्याने मातोश्रीवर ठिय्या आंदोलन करणार, मराठा क्रांती मोर्चाचा मुख्यमत्र्यांना इशारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाज गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील व आप्पासाहेब कुढेकर पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आता आठ दिवसात गनिमी काव्याने मातोश्रीवर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात अभूतपूर्व असे राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते. यानंतरही मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचे दिसते. यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना प्राण दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना दिलेले मदतीचे आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यांच्यासह 42 मराठा तरुणांनी प्राण गमावले होते. त्यांच्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही. यासाठी हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकापासून 23 जुलैला आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत 30 जुलैला मुंबईत बैठक देखील घेण्यात आली होती. पाच ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र पाच तारीखही उलटून गेली आहे. यामुळे आता गनिमी काव्याने मातोश्रीवर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

0