आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात गोवर संकट वाढले:तीव्र प्रादुर्भाव लक्षात घेता 11 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना; डॉ. सुभाष साळुंखे अध्यक्ष

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात गोवर आजाराचे संकट वाढले आहे. या साथीचा तीव्र प्रादुर्भाव लक्षात घेता टास्क फोर्सची स्थापना करावी, असे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेत.

राज्य सरकराने कोरोनाच्या धर्तीवर ही टास्क फोर्स स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केलीय. त्यात एकूण अकरा सदस्य असणार असल्याचे समजते.

डॉ. साळुंखे अध्यक्ष

टास्क फोर्समध्ये संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञांचा समावेश असेल. या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही टीम बैठक घेऊन गोवर नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवेल. तसेच साथ रोखण्यासाठी काय-काय करावे लागेल, याचेही नियंत्रण करणार आहे.

औरंगाबादची ही स्थिती

औरंगाबाद जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण सर्वेक्षणात 2458 बालके आढळून आली आहेत. यात पहिला डोस दिलेली 1401 तर लसीकरण न झालेली बालके 1274 आहेत. तसेच दुसरा डोस दिलेली 1080 तर लसीकरण न झालेली 1184 बालके आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात 79 संशयित रुग्ण असून 4 गोवर व 1 रुबेला निदान झालेले रुग्ण आहेत.

ही आहेत लक्षणे

- खूप जास्त ताप येणे.

- थकवा जाणवणे.

- खूप जास्त खोकला येणे.

- डोळे रक्तासारखे लाल होणे.

- नाक सतत गळणे.

- अंगावर चट्टे येणे.

- घशात खवखवणे.

- तोंडात पांढरे चट्टे येणे.

- स्नायूंमध्ये वेदना होणे.

हा त्रास होतो

- ताप आठवडाभर राहतो.

- तीव्र श्वसनदाह, न्यूमोनियाचा धोका.

- मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्वाची भीती.

- गोवराकडे दुर्लक्ष केल्यास मुलाच्या जीवाला धोका.

येथे आहेत रुग्ण

- औरंगाबाद

- नाशिक

- मालेगाव

- मुंबई

- ठाणे

बातम्या आणखी आहेत...