आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड, लवकरच निवडणूक आयोग करेल अधिकृत घोषणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीडिया रिपोर्टनुसार 18 मे रोजी सर्व आमदारांचा शपथविधी होईल

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सर्व 9 उमेवदारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक आयोग लवकरच याची अधिकृत घोषणा करेल. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे याबाबत माहिती दिली आहे. 21 मे रोजी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार होती, परंतू ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. 

मंगळवारी भाजपने डॉ. अजीत गोपचडे यांना आपली अधिकृत उमेदवारी दिली होती, परंतू पक्षाने ऐनवेळी त्यांचे नाव परत घेऊन भाजप नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडेचे निकटवर्तीय रमेश कराड यांना आपली उमेदवारी दिली. भाजपच्या चार उमेदवारांसोबत कराड यांनीदेखील डमी उमेदवार म्हणून आधीच अर्ज दाखल केला होता. दुसरीकडे काँग्रेसने आपला दुसऱ्या जागेची मागणी मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सहा महिन्याच्या आत त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडणूक जाणे गरजेचे होते.

हे उमेदवार रिंगणात

भाजपच्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीमधून भाजपात आलेले माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेले गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि रमेश कराड आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या किरण पावस्कर आणि शिवाजीराव गर्जे यांनी मंगळवारी आपले अर्ज परत घेतल्यामुळे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचा मार्ग मोकळा. शिवसेनेकडून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोर्हे आहेत. तसेच, काँग्रेसकडून राजेश राठौर यांचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...