आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:'...तर मी निवडणूकच लढवणार नाही'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप- सूत्र

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार घोषित केला आहे

येत्या 21 मे राजी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. सर्व पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पण, यात आता महाविकास आघाडीमध्ये सहाव्या जागेवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दोन जागांवर अडून बसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. 'असेच सुरु राहिल्यास निवडणूक लढवणार नाही', असा निरोप उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती. परंतू, कॉंग्रेसने या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवारही जाहीर केला. विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी या दोघांना उमेदवारी जाहीर केली. आता महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

विधान परिषदेचे उमेदवार

  • उद्धव ठाकरे - शिवसेना
  • निलम गोऱ्हे - शिवसेना
  • राजेश राठोड - काँग्रेस
  • राजकिशोर मोदी - काँग्रेस
  • रणजितसिंह मोहिते पाटील - भाजप
  • गोपीचंद पडळकर - भाजप
  • प्रवीण दटके - भाजप
  • डॉ. अजित गोपछेडे - भाजप
बातम्या आणखी आहेत...