आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशीदेखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलिस आयुक्तांशीदेखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
काय आहे प्रकरण?
आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते.
सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना गुरुवारी दुपारी 2.30 ते दुपारी 3 च्या दरम्यान घडली. यामध्ये दिसतेय की, आरोपीने बलात्कारानंतर महिलेला रॉडने गंभीर जखमी केले. त्यानंतर तिला दयनीय अवस्थेत पिक-अप व्हॅनमध्ये फेकून पळून गेला. रात्रीच्या अंधारामुळे फुटेज फारसे स्पष्ट नसले तरी आरोपींची हालचाल स्पष्ट दिसत आहे. या फुटेजच्या आधारे आरोपी मोहन चौहान (45) याला अटक करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.