आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:कोरोना रुग्णांसाठी कार्डबोर्डचा बेड, सुटकेटसारखा करता येतो फोल्ड; किंमत 1 हजारपेक्षा कमी

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • पुठ्ठ्यापासून बनवलेले हे बेड मुंबईच्या जायना पॅकेजिंग नावाच्या कंपनीने तयार केले आहे
 • वजनाने हलका असणारा बेड एका व्यक्तीला सहजपणे कोठेही शिफ्ट करता येतो

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 40 हजार पार झाली आहे. एकट्या मुंबईत 30 हजारांपेक्षा अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सरकारने 4 लाखांहून अधिक लोकांना क्वारंटाइन केले आहे. यामुळे मुंबईत कोविड रुग्णालयात रुग्णांसाठी तयार केलेले सर्व 3500 बेड भरले आहेत. रुग्णालयांत नाईलाजाने सोशल डिस्टन्सिंग मोडत दोन बेड दरम्यान एक बेड लावावा लागत आहे. 

महापालिकेने पर्याय उपाय म्हणून सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांचे आयसीयू ताब्यात घेतले आहेत. जिमखाना क्लब आणि मोठे क्लब हाउस देखील कोरोना रुग्णांसाठी तयार केले जात आहे. येथे हजारोंच्या संख्येने बेड्स लावण्यात येणार आहेत. 

हा बेड 300 किलोचे वजन सहन करू शकतो 

एकाच वेळी इतक्या बेड्सची मागणी पूर्ण करण्यासाठी बीएमसी आता पुठ्ठ्याचे बनलेले मजबूत बेड मोठमोठ्या क्वारंटाइन सेंटर आणि आयसोलेशन वार्डमध्ये स्थापित करत आहे. पुठ्ठ्याने बनवलेले हे बेड मुंबईच्या जायना पॅकेजिंग नावाच्या कंपनीने तयार केले आहेत. 30 वर्षांपासून पॅकिंग आणि फर्निचर निर्मिती करणाऱ्या या कंपनीच्या मालकाने दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, पुठ्ठ्यापासून बनवलेले असूनही खूपच मजबूत आहेत. हे बेड 300 किलोचे वजन सहजपणे सहन करू शकतात.

बेडचे वैशिष्ट्य 

 • 6'x3'x1.5' आकाराचा हा बेड सूटकेससारखा घडी घालून कोठेही घेऊन जाता येतो.
 • हे केवळ 3 मिनिटांत स्थापित केले जाऊ शकते.
 • हा बेड 300 किलोचे वजन सहजपणे सहन करू शकतात.
 • वजनाने हलके असल्यामुळे एक व्यक्ती सहजरित्या बेड कोठेही शिफ्त करू शकतो.
 • कोरड्या कपड्याने याला स्वच्छ करता येते. यावर सूक्ष्मजंतू केवळ 24 तास राहू शकतात.
 • कोविड रुग्णाच्या वापरानंतर या बेडला सॅनेटाइज आणि रिसायकल केले जाऊ शकते.
 • विशेष बाब म्हणजे यामध्ये कोणतेही मेटल पिन आणि स्टेपल्स वापरलेले नाहीत.
 • सध्या कंपनीकडून बेडची किंमत जवळपास 1 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे.

बेड वापरताना ही खबरदारी घ्यावी लागेल

हरेश मेहता यांनी सांगितले की, बेड पुठ्ठ्याचा (कार्डबोर्ड) बनलेला असल्यामुळे त्याचे पाण्यापासून दूर ठेवावे. पाण्याचे थेंब किंवा कमी पाण्याचा यावर जास्त परिणाम होणार नाही. त्यांनी सांगितले की, कार्डबोर्डपासून बनल्याने आणि स्वस्त असल्यामुळे, रुग्णालये एक वेळ वापरानंतर त्याला नष्ट देखील करू शकतात. 

अशाप्रकारे सुचली कार्डबोर्डचा बेड बनवण्याची कल्पना 

हरेश मेहतांनी पुढे सांगितले की, "आम्ही 30 वर्षांपासून पुठ्ठ्यापासून साहित्य तयार करण्याचे काम करत आहोत. आम्ही आमच्या घरात अशाच बनवलेल्या बेड्स वापरत होतो. मार्चमध्ये, जेव्हा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढू लागली, तेव्हा मी माझ्या संशोधन कार्यसंघाशी याबद्दल चर्चा केली आणि त्यांनी केवळ 2 दिवसांच्या प्रयत्नात हा उत्कृष्ट पलंग तयार केला. सुरुवातीला त्याचे उत्पादन कमी होते, परंतु आता बीएमसीसह अनेक खासगी रुग्णालयांकडून ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही उत्पादनाची गती वाढवली आहे." मेहता यांनी सांगितले की बेड बनवण्याची कल्पना पूर्णपणे त्यांची आणि मेड इन इंडिया आहे.

परदेशातूनही अनेक ऑर्डर मिळाल्या

हरेश मेहता यांनी जगातील अनेक देशांतून या बेडच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. यावरून बेड्सच्या यशाचा अंदाज लावला जाऊ शकतो. परंतु मेहता म्हणतात की, ते आधी देशाची गरज पूर्ण करतील आणि नंतर जगातील इतर कोणत्याही देशात याचा पुरवठा करणार आहेत.  हरेश यांची कंपनी दरमहा 50 हजार बेडची निर्मिती करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...