आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांची तब्येत बिघडली:मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची तब्येत अचानक बिघडली, छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महापौर कार्यालयातून देण्यात आली आहे. छातीत दुखत असल्या कारणाने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

किशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखण्याचा त्रास अधिक वाढल्याने आज सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांना नेमका काय त्रास होत आहे आणि त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज होणार याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...