आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:रात्री मुंबईतील आमदार निवासात अज्ञात नंबरवरुन आला कॉल अन् निवसास्थान बॉम्बने उडवून देण्याची दिली धमकी, यंत्रणांची झाली पळापळ

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्री पावणे बाराच्या सुमारास मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासात अज्ञात नंबरावरून फोन आला होता.

रात्री मुंबईत शहरात एक धक्कादायक घटना घडली. रात्री पावणेबाराच्या सुमारास मुंबईतील आकाशवाणी समोर असलेले आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा एक फोन आला. बॉम्बच्या फोनमुळे यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली. त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब स्क्वाड यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

रात्री पावणे बाराच्या सुमारास मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासात अज्ञात नंबरावरून फोन आला होता. पुढील पाच मिनिटांमध्ये आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे आमदार निवास सुरक्षा व्यवस्था, पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. या शोध मोहिमेमध्ये बॉम्ब सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शोध मोहिमेनंतर हा फोन दिशाभूल करणारा असल्याची माहिती समोर आली.

दरम्यान तापासासाठी श्वानपथक, बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले होते. तातडीने आमदार निवासात राहणाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेरही काढण्यात आले होते. जवळपास दोन तास शोध मोहिम सुरू होती. रात्री पावणेदोन वाजता हा दिशाभूल करणारा फोन असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास घेतला. तसेच पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तिचा नंबर ट्रेस केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...