आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही:राज्यात प्रत्येक 100 संक्रमितांपैकी 2 जणांचा होत आहे मृत्यू; गेल्या 2 महिन्यात महामारीमुळे 36 हजारांपेक्षा जास्त जणांचा झाला मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात कोरोनाच्या स्थितीविषयी बोलायचे झाले तर काल 2,696 नवीन केस समोर आल्या आहेत.

राज्यात कोरोना प्रकरणामध्ये घट होत आहे. मात्र मृत्यूमुळे चिंतेचे वातावरण आहे. येथे गेल्या 24 तासांमध्ये 24,136 नवीन रुग्ण समोर आले आहेत आणि 601 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 36,176 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 92.76% पर्यंत पोहोचला आहे.

अद्याप धोका टळलेला नाही. राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे अद्याप कमी झालेले नाहीत. येथे गेल्या 2 महिन्यांदरम्यान 36,554 लोकांचा मृत्यू झाला आहे. 25 मार्चपर्यंत राज्यात मृत्यूंची एकूण संख्या 53,795 होती. ही आता वाढून 90,349 पर्यंत पोहोचली आहे. मृत्यू दर वाढून 1.6% पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच प्रत्येक 100 संक्रमित रुग्णांमधून 2 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

24 मे वगळले तर, 19 एप्रिलनंतरपासून राज्यात दररोज 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 600 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 24 मे रोजी थोडासा दिलासा मिळाला होता, जेव्हा हा आकडा 361 होता. राज्यात आतापर्यंत 56.26 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यामधून 3.14 लाख रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

गेल्या 10 दिवसांमध्ये जवळपास 10 हजार मृत्यू
गेल्या 10 दिवसांविषयी बोलायचे झाले तर, राज्यात 9,837 लोकांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे. मृतांच्या वाढत्या आकड्यांनुसार राज्यात गंभीर संक्रमितांची संख्या अजुनही जास्त आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितले की, ज्या ठिकाणांवर संक्रमित जास्त आहे, त्या 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशनवर बंदी घातली आहे.

मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती
मुंबईमध्ये मंगळवारी 1037 कोरोनाचे नवीन रुग्ण समोर आले आणि 1,427 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दरम्यान 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे आतापर्यंत 6 लाख 99 हजार 904 लोक मुंबईमध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 6 लाख 55 हजार 425 झाली आहे. यासोबतच 14,708 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कोरोना परिस्थिती
पुण्यात कोरोनाच्या स्थितीविषयी बोलायचे झाले तर काल 2,696 नवीन केस समोर आल्या आहेत. 5,056 लोक कोरोनातून बरे झाले, तर 250 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत 10.03 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 9.46 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोरोनावर मात केली आहे आणि 11,747 लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या 45,648 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...