आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लसीकरण:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे जे रुग्णालयात जाऊन घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, 11 मार्च रोजी घेतली होती पहिली लस

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मुंबईतील जे जे रुग्णालयात जाऊन त्यांनी दुसरा डोस घेतला. त्यांनी यापूर्वी 11 मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.

मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज सकाळी 11.30 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही आज कोरोना लस घेतली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला होता.

दरम्यान राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केवळ एक दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा सध्या राज्यात उपलब्ध आहे. दरम्यान प्रधान सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास म्हणाले की, बुधवारी सकाळपर्यंत राज्यात सुमारे 14 लाख व्हॅक्सीन डोस होते. अनेक जिल्ह्यांमध्ये आज किंवा उद्यापर्यंत हा साठा संपेल. केंद्राला याची जाणीव आहे आणि आम्ही त्यांना लेखी कळवले आहे. ते म्हणाले की, लसांचे वेळापत्रक व उपलब्धता असल्यास महाराष्ट्राला दररोज पाच लाख शॉट्स सहज देता येतील. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आठवड्यातून राज्यात 40 लाख डोसची गरज आहे. आम्ही दिवसाला 4-5 लाख लोकांना लस देत आहोत, जर लस मिळाली नाही तर मोठी समस्या उद्भवू शकते. टोपे म्हणाले, 'आम्ही केंद्राच्या 6 लाख डोज रोज देण्याच्या चॅलेंजला स्वीकार करतो, मात्र व्हॅक्सीन असायला हवी'

बातम्या आणखी आहेत...