आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:राज्यात अवकाळीचा इशारा, तापमानाचा पाराही वाढणार; आज नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. मात्र पुढील 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी सातारा, सांगली, महाबळेश्वर येथे मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली तर कोल्हापुरात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या.

के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ढगा़ळ वातावरण असेल.

तापमानात वाढ

महाराष्ट्रावर ढगांची द्रोणीय स्थिती तसेच खंडित वातस्थिती असल्याने राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, पुण्यात आज आणि उद्या आभाळ अंशतः ढगाळ असेल. अवकाळीबरोबर तापमानात दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

ढगांची द्रोणीय स्थिती

पुण्याचा पारा हा 40 पर्यन्त गुरुवारी पोहचला होता. तर मुंबईतही उष्णतामान वाढले होते. सध्या महाराष्ट्रावर निर्माण झालेली ढगांची द्रोणीय स्थिती पश्चिमेकडे सरकत आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यानंतर राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता अधिक जाणवू लागेल. ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे मुंबई आणि पुण्यात हलका पाऊस होऊ शकतो. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.