आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन सोहळा:सिंधुदुर्गाच्या विकासाचे कारण केवळ नारायण राणे, दुसऱ्याचे नाव तिथे येऊच शकत नाही; उद्धवजी... मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊनच हे केले - नारायण राणे

सिंधुदुर्ग7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंचकावर येण्यापपूर्वी मुख्यमंत्री साहेबही भेटले, काही तरी माझ्या कानाजवळ बोलले, मी अनेक शब्द ऐकले

आज चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा सुरू आहे. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोरा-समोर आले आहेत. राणे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसमोर सिंधुदुर्गाच्या कामाचं श्रेय आपलंच असल्याचे म्हणाले आहेत. उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला असेही नारायण राणे म्हणाले.

या ठिकाणी कोणतेही राजकारण करु नये असे मला वाटत होते. आपण जावे शुभेच्छा द्याव्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उडणारे विमान डोळे भरुन पाहावे या हेतूने मी येथे आलो आहे. विमानं आणि विमानतळ पाहून आनंद वाटला. मंचकावर येण्यापपूर्वी मुख्यमंत्री साहेबही भेटले, काही तरी माझ्या कानाजवळ बोलले, मी अनेक शब्द ऐकले... असो... माझ्या मते विमानतळ होणे आवश्यक आहे. प्रवाशांना सुखसोयी मिळणे महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आर्थिक समृद्धी यावी हीच माझी इच्छा आहे.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला आहे. 90 साली मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तू जा, तुला मागणी आहे. मी येथे निवडूण आलो. मी हा जिल्हा पाहिला. या जिल्ह्यातील अडचणी देखील मी दूर केल्या.. फेब्रुवारीनंतर जिल्ह्याला पाणी देखील नव्हते. पुरेसे रस्ते नव्हते. महामार्गाची दुर्दशा झालेली होती. गावांमध्ये वीज नव्हती. यानंतर या भागाचा विकास मी केला. असं मी म्हणतो, लोक समजून घेतील नेमकं कुणी विकास केला. उद्धवजी, मी बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन मी हे केलेले आहे. पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्गात ज्या पायाभूत सुविधा तयार झालेल्या आहेत, यासाठी कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव तिथे येऊच शकत नाही. असेही राणे म्हणाले आहेत.

त्यावेळी विमानतळ नको म्हणून आंदोलने केली
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धवजी एक विनंती आहे. याच जागेवर भूमिपूजन करण्यासाठी मी आलो होतो. त्यावेळी आंदोलन केली जात होती. भूमिसंपादन करु देणार नाही. आम्हाला विमानतळ नकोय असेही बोलले जात होते. त्या राजवटीमध्ये मी ते मंजूर केले आहे. किती विरोध किती विरोध... मी आता जर नावे घेतली तर राजकारण होईल. अजित पवार साहेबांनी अधिग्रहणासाठी 100 कोटी रुपये दिले सीवर्ल्डच्या. पण काय झाले? ते कुणी रद्द केले कोण तिथे कोणाची आंदोलने सुरु होती? आहेत स्टेजवर. भांडं काय फोडायचे आणि किती फोडायचं? तुम्ही समजताय तसे इथे नाहीये. तेव्हा होतं, आज नाहीये. म्हणून परिस्थिती बदलते आहे. मला फक्त म्हणायचंय, तुम्ही आलात, मला बरे वाटले.

बातम्या आणखी आहेत...