आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमडेसिविरचे रेशनिंग:महाराष्ट्राला दररोजची गरज 50 हजार; केंद्र सरकारकडून मिळणार केवळ 26 हजार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना उपचारात मोठी मागणी होत असलेल्या रेमडेसिविर या विषाणू प्रतिरोधक औषधाचे अखेर ‘रेशनिंग’ झाले आहे. केंद्र सरकारने बुधवारी प्रत्येक राज्याला रेमडेसिविरचा कोटा ठरवून दिला असून महाराष्ट्राच्या वाट्यास दैनंदिन अवघ्या २६ हजार ९०० कुप्या आल्या आहेत. परिणामी राज्यात रेमडेसिविरचा आणखी तुटवडा भासणार आहे. रेमडेसिविरची महाराष्ट्राला दैनंदिन ५० हजार कुप्यांची गरज आहे. मात्र सध्या दैनंदिन ३५ ते ४० हजार इतक्या कुप्या प्राप्त होत आहेत. १० हजार कुप्यांचा दैनंदिन तुटवडा भासत असताना केंद्राने हा पुरवठा २६ हजार ९०० वर आणला आहे. ‘यासंदर्भात आपण केंद्राला पत्र लिहिणार असून दैनंदिन ६० हजार कुप्यांची मागणी करणार आहोत, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे रेमडेसिविर खरेदीच्या निविदा राज्याने काढल्या आहेत. मात्र पूर्वीची खरेदी कोट्यात अंतर्भूत करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी कोंडी झाली आहे.

महाराष्ट्राला २ लाख ६९,२०० कुप्या : देशभर रेमडेसिविरची मागणी वाढत आहे. त्यामुळे केंद्राने १९ राज्यांसाठी कोटा ठरवून दिला. त्यामध्ये महाराष्ट्राला ३० एप्रिलपर्यंत सर्वात जास्त म्हणजे २ लाख ६९ हजार २०० कुप्या, त्याखालोखाल उत्तर प्रदेश १ लाख २२ हजार ८३३, तर गुजरातला १ लाख ६३ हजार ५५९ कुप्यांचा वाटा निर्धारित केला आहे.

सध्या राज्यास दैनंदिन १० हजार रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. मेअखेर राज्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या ११ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रेमडेसिविरचा राज्याला आणखी तुटवडा भासेल, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची रुग्णवाढ पाहता दैनंदिन ६५ हजार रेमडेसिविर कुप्यांची गरज असून मोदी सरकार कमी रेमडेसिविर देऊन राज्याचा छळ करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेमडेसिविर खरेदीबाबत केंद्राने बंधने लादू नयेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली.

देशात दररोज १ लाख २० कुप्यांचे उत्पादन
देशात ७ कंपन्या रेमडेसिविरचे उत्पादन करत असून १ लाख २० हजार कुप्या दैनंदिन उत्पादन होते. महिन्याला सरासरी ३६ ते ३८ लाख कुप्यांचे उत्पादन होत आहे. ते महिन्याला ७४ लाखांपर्यंत नेण्याची सूचना केंद्राने केली असून २० नव्या निर्माण केद्रांना मान्यता दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...